Ad will apear here
Next
मृगाच्या आनंदसरी!!!

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात रविवारपासून (११ जून) मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी नागरिकही सुखावले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेनंतर लगेच निसर्गाने साथ दिल्यामुळे शेतकरी आनंदले आहेत. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या शहरी नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून सोलापूर जिल्हा दुष्काळाशी सामना करतो आहे. तसेच दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यात मृगाच्या सरी बरसल्या आहेत. या पहिल्याच पावसाने पाणीच पाणी चोहीकडे अशी परिस्थिती दिसू लागल्याने ‘आनंदी आनंद गडे’ अशी साऱ्यांचीच भावना आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापल्यामुळे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत केलेल्या कामांमध्ये पाणी साठून राहिले आहे. तसेच, ओढे व नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले आहेत. काही शेतांत असलेल्या पिकांतही पाणी भरून राहिले आहे. 

एकाच वेळी सर्वदूर पाऊस पडत नसल्यामुळे काही भागांत अजूनही शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत; मात्र अनेक भागांत चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच अंगात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. वरुणराजाची ही कृपा यंदाच्या संपूर्ण हंगामात अशी राहू दे, अशी प्रार्थना सर्व जण करत आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZJOBD
Similar Posts
‘पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का?’ सोलापूर : ‘पावसाचा अजून पत्ताच न्हाय... आत्ता जरी पाऊस पडला, तरी पेरणी करताच येत न्हाय...आकाड सरला की लगीच सरावन लागतूय...अणं सरावनात, तर बैल पोळ्याला ज्वारीची पेरणी करावी लागतीय... यंदाचा ही हंगाम वायाच गेला बघा... पाऊस काशाचा नुसत वारच भकाय लागलय...! आज उद्या पाऊस पडलच की पाऊस न्हाय म्हणून शेतीची
...आणि खारट ऊस गोड झाला पंढरपूर : माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थातच शेतीच्या शाश्वततेला महत्त्व आहे. विविध कारणांमुळे आज मातीची सुपीकता घटत चालली असून, अनेक ठिकाणी वाळवंटीकरण होऊ लागले आहे. हा चिंतेचा विषय बनला असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुरूम व गाळमातीचा वापर करून जमीन सुपीक बनवली आहे. वाळवंटीकरणाबद्दलची
‘आम्ही संपात आहोत; पण शेतीमालाची नासाडी पटत नाही’ पंढरपूर : संप किंवा बंद म्हटले, की खळ्ळ-खटॅक ठरलेलेच; मात्र सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावात कोणत्याही शेतमालाची नासाडी न करता शेतकऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस पार पडला. हे शेतकरी संपात सहभागी असले, तरी होता होईल तो शेतीमालाची नासाडी करायची नाही, असा सारासार विचार त्यांनी केला आहे
सरड्याची धाव पाण्यापर्यंत... पंढरपूर : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते मात्र सरिसृप वर्गातील प्राण्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. परंतु तापमानाचा पारा खूपच चढू लागल्यामुळे चक्क सरड्यालाही तहान लागल्याने त्याने पाण्याकडे धाव घेतल्याचे पंढरपूर परिसरात आढळून आले आहे. प्राणिशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते ही दुर्मीळ घटना आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language